रुद्रपूर : साखर कारखान्यातील समस्यांची लवकरात लवकर सोडवणूक करावी अशी मागणी आमदारांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडे केली. आगामी गळीत हंगामात कारखान्याचे ऊस गाळप उद्दिष्ट वाढवावे असेही त्यांनी सांगितले. कारखान्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण करावे अशी सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना केली.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आमदार तिलकराज बेहड यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक त्रिलोक सिंह मर्तोलिया यांची भेट घेतली. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने घटत असल्याचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले. करार केल्यानंतरही ठेकेदार बाहेरील लोकांकडून काम करून घेत आहे. त्याऐवजी आगामी हंगामात स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी आमदार बेहड यांनी केली. कारखान्यातील देखभाल, दुरुस्तीचे काम गुणवत्तेनुसार करावे अशी सूचना त्यांनी केली. कार्यकारी संचालक मर्तोलिया यांनी आगामी गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी सभासद लियाकत अली, दिलीप सिंह बिष्ट, जीवन जोशी, गौरव बेहड, संतोष सिंह, महेंद्र सिंह, कुर्बान अली, संतराम आदी उपस्थित होते.