उत्तराखंड : नादेही साखर कारखान्याकडून ५.८ कोटी रुपयांची ऊस बिले अदा

काशिपूर : नादेही साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ६ डिसेंबरपर्यंत १ लाख ३६ हजार ३९५.६३ क्विंटल उसाची खरेदी केली आहे. कारखान्याने यासाठी शेतकऱ्यांना पाच कोटी आठ लाख रुपयांची बिले अदा केली आहेत. साखर कारखान्याने आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १० कोटी ३७ लाख रुपये दिले आहेत. कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले दिली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कारखान्याचे व्यवस्थापक सीएस इमलाल यांनी सांगितले की, २ जानेवारीपर्यंत नादेही साखर कारखान्याने ८.१५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. त्यापासून ७५,३४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा आजचा सरासरी उतारा १०.३५ टक्के असून आजपर्यंतचा सरासरी साखर वसुली ९.४५ टक्के आहे. शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचा ऊस पुरवठा करण्याचे आवाहन व्यवस्थापक इमलाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here