उत्तराखंड: जीपीएस तंत्राने होणार ऑनलाइन ऊस सर्वेक्षण

रुडकी : जिल्ह्यात आगामी गळीत हंगामात किती ऊस उपलब्ध आहे, याची माहिती मिळावी यासाठी ऊस विभागाने लागवड क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यंदा हा सर्व्हे जीपीएस तंत्राने ऑनलाइन केला जाईल. यासाठी अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात लक्सर, लिब्बरहेडी आणि इक्बालपूर हे तीन साखर कारखाने आहेत. पुढील गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये या कारखान्यांना किती ऊस उपलब्ध असेल याची माहिती घेण्यासाठी सर्व्हेची तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी मोजणीच्या पद्धतीद्वारे ऊस लागवड क्षेत्राचा सर्व्हे केला जात होता. मात्र, आता जीपीएस तंत्राने ऑनलाइन सर्व्हे केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here