डेहराडून : पंजाब सरकारच्यावतीने ऊस दरात वाढ केल्यानंतर आता उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंडमधील ऊस उत्पादक शेतकरीही आपापल्या राज्य सरकारांकडून ऊस दरात वाढ केली जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत अमर उजलामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तराखंडमध्ये ऊस दर निश्चित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जात आहे.
उत्तराखंड सरकारनेसुद्धा ऊस दरात वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सरकारी साखर कारखाने ऊस गाळपासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. यामध्ये १७ रोजी नादेही साखर कारखाना आणि २० नोव्हेंबर रोजी डोईवाला साखर कारखान्यामध्ये गाळप सुरू होणार आहे. सरकाच्यावतीने कॅबिनेटच्या बैठकीत ऊसाच्या किमान समर्थन दराबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.