रुडकी : लक्सर साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून चालू गळीत हंगामात आधीच १५ फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी सर्व बिले ऊस समित्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय कुमार खंडेलवाल यांनी ही माहिती दिली.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आता कारखान्याने १६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत खरेदी केलेल्या उसाचे एकूण ४२.४६ कोटी रुपयांचा धनादेश ऊस समित्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. लक्सर समितीचे प्रभारी सचिव सूरजभान सिंह यांनी सांगितले की, चेक समितीच्या खात्यावर जमा झाला आहे. पैसे जमा झाल्यावर ते संबंधित खात्यांवर जमा केले जातील.