रुडकी : सद्यस्थितीत लक्सर साखर कारखान्याला पुरेसा ऊस पुरवठा होत आहे. मात्र, आगामी काळात कारखान्याने आपल्याकडील ३६ ऊस खरेदी केंद्रे बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. या केंद्रांकडून कारखान्याला पुरेसा ऊस पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. लक्सर कारखान्याला ऊस समितीशिवाय, ज्वालापूर, इक्बालपुर, लिब्बरहेडी आणि उत्तर प्रदेशातील नजीबाबाद ऊस समितीकडून ऊस पुरवठा केला जातो. या समित्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी १०१ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कारखान्याकडून दररोज जवळपास ८० हजारहून अधिक क्विंटल उसाची खरेदी केली जाते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लक्सर साखर कारखान्याच्या ऊस विभागाचे महा व्यवस्थापक पवन ढिंगरा यांनी सांगितले की, सध्या लक्सर ऊस समितीच्या सर्व केंद्रांकडून पुरेसा ऊस मिळत आहे. बाहेरील सेंटर्सकडून काही दिवसांपासून कारखान्याला पुरेसा ऊस मिळत नाही. त्यामुळे पुढील एक – दोन दिवसात ४५ सेंटर बंद केली जावू शकतात. इतर समित्यांमध्ये असलेली केंद्रे बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जोपर्यंत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस गाळप केला जात नाही, तोपर्यंत कारखाना सुरूच राहिल.