उत्तराखंड: आगीत तीन लाखांचा ऊस जळून खाक

रुडकी : खानपूरमधील गोवर्धनपूर गावातील प्रभू ऊर्फ प्रदीप यांच्या गंगनौली गावाजवळील शेतात उभ्या ऊस पिकाला आलग लागली. ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रदीप यांनी सांगितले. शेताजवळील विजेच्या खांबावर अनेकदा स्पार्किंग सुरू होते. त्यातून ठिणग्या पडत असल्याचे वीज खात्याच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आग लागल्याचा आरोप त्यांनी केला. वीज मंडळाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी प्रदीप यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here