सहारनपूर : आरोग्य विभागाने त्रिवेणी साखर कारखान्यात लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये १६० हून अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कोरोना विरोधी लस घेतली.
लाला पूरणचंद साहनी मेमोरियल इंटर कॉलेजच्या परिसरातील लसीकरण शिबिराचा प्रारंभ कारखान्याचे उप महाव्यवस्थापक श्रीकांत पांडे यांनी केले. त्यांना लसीचा डोस देण्यात आला. या वेळी वरिष्ठ व्यवस्थापक संदीप बालियान, कारखान्याचे व्यवस्थापक गिरीश कोहली, अतिरिक्त व्यवस्थापक राजीव त्यागी, दिनेश तिवारी, जितेंद्र पुंडीर, आर. के. सिंह, अमित यांसह १६० कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लस देण्यात आली.
युनिटचे उपाध्यक्ष दिनानाथ मिश्र यांनी सांगितले की, कोरोनाच्या संक्रमणापासून स्वतःला वाचविण्यासाठी फक्त लस हाच एकमेव उपाय आहे. कारखान्याच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल असे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे निरीक्षक डॉ. इंद्राज सिंह यांनी सांगितले की, या केंद्रासह इतर ठिकाणीही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link