‘हुतात्मा’च्या चेअरमनपदी वैभव नायकवडी यांची फेरनिवड

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वैभव नायकवडी यांची फेरनिवड झाली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळामधून चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची सभा सोमवारी सकाळी ११ वा. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या हॉलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळे होते. सभेत व्हा. चेअरमनपदी रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी वैभव नायकवडी व रामचंद्र भाडळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्याचे मावळे यांनी जाहीर केले. नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा मावळे यांनी पुष्पहार देऊन अभिनंदन केले. यावेळी गौरव नायकवडी, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विरधवल नायकवडी, नंदकुमार शेळके व प्रा. विनय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. चेअरमन वैभव नायकवडी म्हणाले की, आपल्या कारखान्याने चांगले काम केलेने आपणास राज्य व देशपातळीवरील ५० पेक्षा जास्त पारितोषिक मिळालेली आहेत. आता कारखान्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी आपला सहभाग वाढवावा. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर, सेक्रेटरी मुकेश पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here