मुझफ्फरनगर : भारतीय किसान युनीयने केलेल्या मागणीमुळे साखर कारखानदार अस्वस्थ झाले आहेत. साखर कारखान्यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागात आयसोलेशन सेंटर सुरू करावेत अशी मागणी भाकियूने केली आहे. भाकियूने स्वतः सिसौली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजनयुक्त सहा बेडची व्यवस्था केली आहे.
त्यानंतर भारतीय किसान युनीयनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी जिल्ह्यात आठ साखर कारखान्यांपैकी एक सरकारी कारखाना वगळता इतर सर्व सात कारखान्यांच्या प्रतिनिधींना पत्र पाठवले आहे. परिसरात सुविधांच्या कमतरतेमुळे लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आपल्या कॅम्पसमध्ये १००-१०० बेडच्या हॉस्पिटलची सोय करावी. ही सुविधा सीएसआर फंडातून केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.
भाकियूच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी विविध साखर कारखान्यांत जाऊन कारखाना प्रतिनिधींना या मागणीचे निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांचा जीव वाचविण्यास प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाकियूचे राष्ट्रीय अध्यक्ष टिकैत याच्या पत्रानंतर डीएसएम साखर कारखाना मंसूरपूरने खतौली आरोग्य केंद्राची पाहणी केली. खतौलीचे आमदार विक्रम सिंह सैनी यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५ ऑक्सिजन सिलिंडर, ५ ऑक्सिजन कन्सेंट्रेटर दिले. यावेळी भाजप आमदार विक्रम सिंह सैनी यांनी आपल्या प्रयत्नांनी हे काम झाल्याचे सांगितले.