अमरोहा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्वरीत बिले देण्यात यावीत, मोकाट जनावरांची गो शाळेत व्यवस्था करावी आदी मागण्या भारतीय किसान युनियनच्यावतीने मंडी समितीत आयोजित पंचायतीमध्ये करण्यात आल्या आहेत.
याबाबत लाइव्ह हिंदू्स्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मोकाट जनावरांकडून पिकाची नासाडी सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पंचायतीमध्ये केला. अधिकाऱ्यांनी अशा जनावरांना पकडून गोशाळेत दाखल करावे अशी विनंती यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र, कोणतीचा कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे अनेकांनी सांगितले. ऊसाची बिले महिन्यानंतरही मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. खरेतर १४ दिवसांत ही बिले मिळायला हवीत. ऊस बिले लवकर न मिळाल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. सरकारने शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे उपलब्ध करून द्यावे. साखर कारखान्याकडून किटकनाशके द्यावीत अशी मागणी करण्यात आली. १६ फेब्रुवारी रोजी शहीद दिवस साजरा केला जाईल असे सांगण्यात आले. यावेळी विभाग अध्यक्ष काले सिंह, महेंद्र सिंह, राम सिंह, ओमप्रकाश, बाबू अली, बलवीर सिंह, वृतपाल सिंह, मंगल सिंह, अर्जुन सिंह आदी उपस्थित होते.