सातारा : दुष्काळी परिस्थिती असताना वर्धन ॲग्रो कारखान्याने उच्चांकी गाळप केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोव्हेंबरअखेर २९०० रुपये तर १ डिसेंबरपासून ३१११ रुपये दर दिला आहे. मालक तोडणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ४,१११ रुपये दर देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काटा पूजन, काट्यावरील शेवटच्या वाहनाचे पूजन, वाहतूक, कंत्राटदार, वाहन मालक, ऊस उत्पादक शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला.
धैर्यशील कदम म्हणाले की, कारखानाच्या क्षमतेनुसार उच्चांकी गाळप या हंगामात केले आहे. साखरेचा उतारा सरासरी चांगला आहे. पुढील हंगाम ऑगस्ट महिन्यात सुरू केला जाईल. कारखान्याचे तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असेल. त्यादृष्टीने ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी सहकार्य करावे. यावेळी ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, संपतराव माने, सुनील पाटील, भीमराव डांगे, महेश जाधव, विलासराव आटोळे उपस्थित होते. सावकार जाधव यांनी सूत्रसंचलन केले. कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी प्रास्ताविक केले. संचालक दीपक लिमकर यांनी आभार मानले. संचालक अविनाश साळुंखे, यशवंत चव्हाण, शरद चव्हाण, संतोष घाडगे, सतीश सोलापुरे, कराड मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र चव्हाण, महेश घार्गे, तात्या साबळे, अकबर बागवान, सतीश पिसाळ उपस्थित होते.