सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ. जयंत पाटील, साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी, दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.
आ. पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता कारखाना कार्यस्थळावर स्व. बापूंच्या पुतळ्याचे पूजन केले जाणार आहे. राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे. या मेळाव्यासाठी दिवंगत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. राजारामबापू कारखान्याच्या वाटेगाव- सुरूल शाखा कार्यस्थळावर संचालक वैभव साळुंखे – पाटील यांच्या हस्ते, कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर संचालक अमरसिंह साळुंखे तर तिप्पेहळी-जत युनिट कार्यस्थळावर संचालक विठ्ठलराव पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.