राजारामबापू कारखान्यावरील श्रीराम मंदिरात आज विविध कार्यक्रम

सांगली : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरामध्ये आज, सोमवारी विविध कार्यक्रम होणार आहेत. श्रीराम मंदीर व परिसरात रंग-रंगोटी, साफ-सफाई, आकर्षक रोषणाई केली आहे. आरती सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

कारखाना कार्यस्थळावर मंदिरात दुपारी १२ वाजता कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, व त्यांच्या पत्नी अलिका पाटील यांच्या हस्ते पूजा व आरती केली जाणार आहे. लोकेनते राजारामबापू पाटील यांनी ४२ वषापूर्वी कारखाना कार्यस्थळावर श्रीराम मंदिर बांधण्याची संकल्पना मांडली होती. विचारवंत वि. स. पागे यांच्या हस्ते १५ जुलै १९८२ साली मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. २५ ऑगस्ट १९८८ ला मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिरात रामनवमी सोहळा उत्साहाने साजरा केला जातो. गेल्या ३५ वर्षांपासून हे श्रीराम मंदीर जिल्ह्यातील, तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान ठरलेले आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव आर. डी. माहुली, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर आदी कार्यक्रमाची तयारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here