राजारामबापू पाटील साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादनवाढीसाठी विविध योजना

सांगली:राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने व कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ऊस पीक उत्पादन वाढीच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी केले. वाळवा तालुक्यातील इटकरे, वशी, कुरळप व करंजवडे येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने ऊस उत्पादक शेतकरी प्रशिक्षण शिबिर झाले.यावेळी ते बोलत होते. संचालक दीपक पाटील, रामराव पाटील, अमरसिंह साळुंखे, जयसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, बँकेचे संचालक प्रशांत पाटील, पी.टी.पाटील, अमोल कुंभार, डी.एल.पाटील, जोतिराव माळी, पी.जी.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

सुजयकुमार पाटील म्हणाले, कारखान्यांच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजना, क्षारपड जमीन सुधारणा, सेंद्रिय व जैविक खते शेतकऱ्यांना कमीत-कमी किमतीत दिली जातात.औषध फवारणीस ड्रोन, कॅमेराद्वारे पिकांतील कमतरता यांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते.ऊस रोपे कारखान्यांच्या माध्यमातून दिली जात आहेत.संचालक दीपक पाटील म्हणाले, कारखान्यांच्या माध्यमातून विविध सेंद्रिय, जैविक व समृद्धी, गांडुळ खते शेतकऱ्यांना कमीत कमी दरात उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याचा फायदा शेतीला चांगला होत आहे.

गटाधिकारी दिलीप पाटील यांनी स्वागत केले.सुरेश पाटील, बाबासो पवार, संदीप पवार, यशवंत बावचकर, इकबाल जमादार, वसंतराव यादव, सचिन माने, रोहित देवकर, गणपतराव पाटील, इकबाल मुलाणी, योगेश पाटील, जयदीप देवकर, दिलीप जाधव, देवर्डे सरपंच अनंत पाटील, दिनकर पाटील, बाबासो पाटील, बाजीराव पाटील, विजय पाटील, श्रीकांत पाटील, संदीप मदने, शिवाजी देसाई, आबासाहेब चेंडके, आनंदराव पाटील व शेतकरी उपस्थित होते.संचालक अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here