भीमाशंकर कारखान्याला वसंतदादा पाटील पुरस्कार : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची घोषणा

पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

दरम्यान, उत्कृष्ट ऊस उत्पादकता गटामधील पहिला पुरस्कार जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला, तर द्वितीय सांगलीमधील क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आणि तृतीय पुरस्कार सुरतच्या श्री महुआ प्रदेश सहकारी खांड उद्योगला जाहीर झाला आहे. २५ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील दहा साखर कारखान्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्याखालोखाल तमिळनाडूला पाच, उत्तर प्रदेशला चार, गुजरातला तीन, तर पंजाब, हरियाना आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका कारखान्याला पुरस्कार मिळाला आहे.

विविध विभागनिहाय पुरस्कार…

तांत्रिक क्षमता गट –

■ प्रथम : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (कराड, जि. सातारा)

■ द्वितीय : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना (श्रीपूर, सोलापूर)

■ तृतीय : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना (वांगी, जि. सांगली)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन पुरस्कार –

■ प्रथम : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना (जालना)

■ द्वितीय: श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी (भरूच, गुजरात)

■ तृतीय : श्री नर्मदा खांडसरी उद्योग सहकारी मंडळी (नर्मदा, गुजरात)

विक्रमी ऊस गाळप विभाग –

■ प्रथम : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (सोलापूर)

विक्रमी साखर उतारा –

■ प्रथम : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर)

उच्च साखर उतारा अत्युत्कृष्ट साखर कारखाना –

■ श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (बारामती)

उर्वरित विभाग उत्कृष्ट ऊस उत्पादकता –

■ प्रथम : बुधेवाल सहकारी शुगर मिल्स (लुधियाना, पंजाब)

■ द्वितीय : कल्लाकुरीची शुगर (विल्लुपुरम, तमिळनाडू)

■ तृतीय : किसान सहकारी साखर कारखाना (शाहजहांपुर, उत्तर प्रदेश)

तांत्रिक कार्यक्षमता –

■ प्रथम : करनाल सहकारी साखर कारखाना (करनाल, हरियाना)

■ द्वितीय : चेव्यार सहकारी साखर कारखाना (तिरुवन्नमलै, तमिळनाडू)

■ तृतीय : किसान सहकारी साखर कारखाना (आझमगढ, उत्तर प्रदेश)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन –

■ प्रथम : नवलसिंह सहकारी साखर कारखाना (बुन्हाणपूर, मध्य प्रदेश)

■ द्वितीय : चेंगलरायन सहकारी साखर कारखाना (विल्लुपुरम, तमिळनाडू)

■ तृतीय : धर्मापुरी डिस्ट्रिक्ट सहकारी साखर कारखाना (धर्मापुरी, तमिळनाडू)

विक्रमी ऊस गाळप –

■ प्रथम : रमाला सहकारी साखर कारखाना (बागपत, उत्तर प्रदेश)

विक्रमी साखर उतारा –

■ प्रथम : किसान सहकारी साखर कारखाना (बागपत, उत्तर प्रदेश)

उर्वरित विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी कारखाना –

■ सुब्रनिया शिवा सहकारी साखर कारखाना (धर्मापुरी, तमिळनाडू)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here