वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास पूर्ण सहकार्य करू : आ. डॉ. राहुल आहेर

नाशिक : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, हा भाडेतत्वावर चालविण्यासाठी कोणी पुढे येत असेल त्याला पूर्ण सहकार्य करू, असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल आहेर यांनी येथे केले. वसाका कृती समितीने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन स्थानिक आमदारांनी वसाकाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती, त्या अनुषंगाने आ. डॉ. आहेर यांनी सांगितले की, यापूर्वी बँकेने वसाका विक्रीची जाहिरात काढली, तेव्हा याची विक्री होऊ नये व तो भाडेतत्वावर किंवा चालवायला द्यावा याबाबत आग्रही भूमिका मांडली होती. जे वसाका विकत घेण्यासाठी येत होते, त्यांनादेखील मी परावृत्त केले. मात्र त्या वेळेस कुणीही सोबत आले नाही.

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना १२ वर्षांपासून बंद पडला होता. त्याला पुन्हा उर्जितावस्थेत आणून सन २०१५ मध्ये धाराशिव उद्योग समुहाला वसाका भाडेतत्वावर देण्यात आला. परंतु दुष्काळ, समन्वयाच्या अभावामुळे वसाका पुन्हा बंद पडला. हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांसह तालुकावासियांसाठी कारखाना पुन्हा सुरू होण्याची तालुका वासियांना प्रतिक्षा आहे. याबाबत आमदार आहेर यांनी सांगितले की, आपण सर्व राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र येत यासाठी प्रयत्न करायला हवे. याबाबत माझी नेहमीच सकारात्मक भूमिका होती व असेल.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here