वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये २०२४-२५ साठी नवीन अभ्यासक्रमांची भर : महासंचालक संभाजी कडू-पाटील

पुणे : साखर उद्योगाच्या शिक्षण व प्रशिक्षण विषयक गरजा भागविणारी देशातील एक अग्रणी शिक्षण संस्था म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट (VSI) ला ओळखले जाते. साखर उद्योगासाठी लागणा-या तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. VSI मधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी देश- विदेशात साखर तसेच अन्य संलग्न उद्योगामध्ये विविध पदावर काम करत आहेत. भारत सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने संस्थेतील विविध पदव्युत्तर डिग्री, डिप्लोमा व सर्टिफिकेटस् अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून ए.एन.एस.आय. (कानपूर) च्या धर्तीवर सर्व अभ्यासक्रमास समान मान्यता दिली आहे.

VSI मार्फत शुगर टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल फर्मेटेशन अॅन्ड अल्कोहोल टेक्नॉलॉजी, शुगर इंजिनिअरींग डिप्लोमा, शुगर इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी असे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच शुगर इंजिनिअरिंग सर्टिफिकेट, शुगर मॅन्युफॅक्चरिंग सर्टिफिकेट, शुगर बॉयलिंग सर्टिफिकेट, ज्यूस सुपरव्हिजन असे सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरु आहेत. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न एनव्हॉरर्नमेंटल सायन्सेस, वाईन बूवींग अॅण्ड अल्कोहोल टेक्नॉलॉजी मास्टर डिग्री, हे अभ्यासक्रम राबविले जातात. संस्थेने सातत्याने वाढलेली शैक्षणिक गुणवत्ता आणि उच्च दर्जाचे अध्यापन या वैशिष्ट्यामुळे संस्थेस देशात व परदेशात नावलौकीक प्राप्त झाला आहे.

सध्या साखर कारखान्यांना तांत्रिक मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात उणीव भासत आहे. त्याचा परिणाम कारखान्यांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. हे ओळखून संस्थेमध्ये नव्याने महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांच्या मान्यतेने संस्थेमध्ये प्रथमच एस.एस.सी. व बी.एस.सी. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खालील अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन क्वॉलिटी कंट्रोल लॅबोरेटरी टेक्निशियन, सर्टिफिकेट कोर्स इन फिटर, सर्टिफिकेट कोर्स इन इलेक्ट्रीशिअन असे अभ्यासकम सहा महिन्याचे असून सर्टिफिकेट कोर्स इन बॉयलर अॅटेन्डंट हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा आहे. वरील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना साखर कारखान्यांवर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकतात. अधिक माहितीसाठी www.vsisugar.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here