हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शक्यता वर्तवली आहे, की पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण पूर्व भागातील अरबी समुद्र, लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ मंगळवारी ११ किमी प्रति ६ तास वेगाने सरकत आहे. बुलेटिन मध्ये त्यानी असे नमूद केले कि, युवा वादळाचा पुढच्या 24 तासांत वादळांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
१२ आणि १३ जून असे दोन दिवस अरबी समुद्रात, उत्तर पूर्व भागात आणि गुजरातच्या किनाऱ्यावरही ‘वायू’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता असून खोल समुद्रात गेलेल्यांनी तत्काळ माघारी यावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
उद्या १२ जून या दिवशी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग, ताशी ७० किमी पर्यंत पोहोचणार आहे. तसेच वाऱ्याच्या वेगात वाढ होणार असून ताशी १२० ते १३५ किमी च्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून गुजरातच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी १३५ किमी पर्यंत पोहोचणार आहे.
उत्तर अरबी समुद्रात तसेच गुजरातच्या किनारपट्टीवर सुमारे ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहणार असून हळू हळू वादळाचा वेग मंदावणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १३ जून नंतर वादळाची तीव्रता कमी होत जाणार आहे.