वियतनाम: सीमा शुल्क विभागाला साखर तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश .

हनोई : वियतनामचे प्रधानमंत्री गुयेन जून्ग फुक यांनी सीमा शुल्क विभागाला साखर तस्करी आणि साखर व्यापारातील धोका या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पीएम यांनी मंत्रालयांला विनंती केली आहे की, त्यांनी प्रश्‍नांचे निराकरण करावे आणि साखर उद्योगातील स्पर्धेत सुधारणा करावी. घरगुती साखर बाजाराला स्थिर ठेवण्यासाठी अवैध साखर आयातीवर कडक पद्धतीने नियंत्रण ठेवले पाहिजे.

पीएम फुक यांनी उद्योग आणि व्यापार मंत्रालयाला आयातित साखऱ उत्पादनांच्या व्यापार उपायांची देखभाल आणि प्रस्तावासाठी संबंधीत एजन्सीज बरोबर काम करण्यास सांगितले. ते म्हणाले, उद्योग आणि व्यापारी मंत्रालयाला व्यापार उपायाच्या तक्रारींशी निपटण्याबरोबरच उद्योगांच्या सहाय्यासाठी निर्यात, आयात आणि उत्पादनावर अचूक डेटाबेस स्थापित करावा लागेल. साखरेची तस्करी आणि व्यापारातील धोके कमी करण्यासाठी बाजार व्यवस्थापन कडक करणे आवश्यक आहे. कृषी आणि ग्रमाीण विकास मंत्रालयाला आग्रह केला की, त्यांनी ऊस पिकणार्‍या क्षेत्रांमध्ये मशीनीकरण आणि सिंचनाला गती देण्यासाठी एक नवा निर्णय घ्यावा आणि नव्या ऊसाच्या जातींचे संशोधन आणि प्रमुख ऊस उत्पादक क्षेत्रांच्या विकासासाठी पूंजी ला प्राथमिकता द्यावी. त्यांनी ऊस उत्पादन मूल्य कमी करण्यासाठीही सांगितले आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here