हनोई (सिन्हुआ): व्हिएतनाम च्या औद्योगिक उत्पादनामध्ये यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यात 2.6 टक्के वाढ झाली आहे. पण दुसरीकडे रिफाइंड साखरेच्या उत्पादनात सर्वात अधिक 23.1 टक्के इतकी घट दिसून आली आहे. विजेचे उत्पादन आणि वितरण क्षेत्रामध्ये 2.1 टक्के इतकी वृद्धी झाली आहे. कोविड 19 महामारी ने जागतिक स्तरावर पुरवठा शृंखलेला बाधित केले आहे. ज्यामुळे औद्योगिक उत्पादनासाठी अडचणी वाढल्या आहेत.
विएतनाम चे पंतप्रधान गुयेन फुक यांनी सीमा शुल्क विभागाला साखर तस्करी आणि साखर व्यापार्यातील धोका आदींवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. पीएम यांनी मंत्रालयांना आग्रह केला की, त्यांनी अडचणींचे निवारण करावे आणि साखर उद्योगातील स्पर्धेमध्ये सुधारणा करावी. घरगुती साखर बाजाराला स्थिर ठेवण्यासाठी अवैध साखर आयातीवर कडक निर्बंध घातले पाहिजेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.