व्हिएतनाम करणार २,००,००० टन साखरेची आयात

हनोई : व्हिएतनामने १,६०,००० टन कच्ची आणि ४०,००० टन प्रक्रिया केलेली साखर आयात करण्यासाठी परवाने जारी केले आहेत. साखर कोट्याची विक्री करण्यासाठी सात उद्योजकांनी लिलावधारकांच्या रुपात नोंदणी केली आहे. त्यापैकी पाच जणांनी १,००,००० टन कच्ची साखर आणि दोघांनी २५,००० टन प्रक्रियायुक्त साखरेसाठी निविदा जिंकली आहे.

लिलावात निविदा जिंकणाऱ्या पाच प्रमुखांमध्ये व्हिएतनाम शुगर जेएससी, थान थान कांग बिएन होआ जेएससी, बिएन होआ कंझ्युमर जेएससी, बिएन होआ निन्ह होआ शुगर वन मेंबर लिमिटेड आणि क्वांग नगाई शुगर जेएससी यांचा सहभाग आहे. यापैकी प्रत्येकासाठी साधारणतः २०,००० टनाचा कोटा होता. इतर दोन लिलावधारक सटोरी पेप्सिको व्हिएतनाम बेवरेज यांना साखरेचा २०,००० टन कोटा देण्यात आला आणि कोका-कोला बेव्हरेजिस व्हिएतनाम लिमिटेडला ५,००० टन कोटा देण्यात आला आहे. उद्योग आणि व्यापार उप मंत्री Tran Quoc Khanh यांनी सांगितले की, साखरेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी आयात करणे हाच एक उपाय होता. व्हिएतनामला ऊस शेतीचा विस्तार करणे आणि रिफायनरीची उत्पादकता वाढविण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here