व्हिएतनामच्या साखर उद्योगात यावर्षी सुधारणा होण्याची अपेक्षा

हनोई : व्हिएतनामच्या साखर उद्योगात यंदा सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे. आणि साखर उद्योग साखरेच्या उच्च किमती आणि थायलंडकडून निर्माण झालेल्या काही ऊस उत्पादनांवर डंपिंगविरोधी उपाय योजनांमुळे खूप उत्साही आहे. व्हिएतकॉमबँक सिक्युरिटीज कंपनी (व्हीसीबीएस)ने सांगितले की, पिक वर्ष २०२१-२२ मधील ऊस उत्पादन ९,४९,२०० टनापर्यंत पोहोचले होते. त्यातून साखर उत्पादन ७,४६,९०० टन झाले. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.३ टक्के अधिक आहे. ऊस तोडणी क्षेत्र वार्षिक आधारावर ४ टक्क्यांनी कमी झाले असले तरी ऊस उत्पादन ६४.६ टन प्रती हेक्टरपेक्षा अधिक आहे.

परिणामी, ऊस उत्पादनात ११.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२२ मध्ये एकूण साखर पुरवठा २.८ मिलियन टन होण्याचे अनुमान वर्तविण्यात आले होते. मात्र, त्यावेळी मागणी २.१-२.३ मिलियन टन होती. अधिक पुरवठ्यानंतरही डंपिंग विरोधी धोरणामुळे स्थानिक साखरेच्या किमतीत खूप वाढ झाली आहे.

अँटी डंपिंग टॅक्स पूर्वी, व्हिएतनामच्या साखरेचा दर इंडोनेशिया आणि चीनच्या जवळपास होता. फिलिपाईन्सची निम्मी किंमत आणि थालयंडच्या साखरेच्या तुलनेत दर जवळपास २५ टक्के अधिक होते. मात्र, अँटी डंपिंग टॅक्सनंतर थायलंडकडून आयात आणि थायलंडकडून जाणाऱ्या साखरेची किंमत चीन, इंडोनेशिया आणि व्हिएतनामच्या साखरेच्या किमतीपेक्षा १०-१५ टक्के अधिक आहे. व्यावसायिक व्यवहार वाचवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनेनंतर आशियाई देशात, विशेषतः थायलंड, लाओस, कंबोडियाकडून व्हिएतनाममध्ये आयात केल्या जाणाऱ्या साखरेच्या काही उत्पादनांच्या प्रमाणात स्पष्ट रुपात घसरण झाली आहे. २०२२ मध्ये एकूण साखर आयातीमध्ये वार्षिक आधारावर १२.६ टक्क्यांची घसरण झाली. पुरवठ्यातील कमतरतेमुळे शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्याचा दर VNĐ१.0५-१.१ मिलियन प्रती टनापर्यंत पोहोचला. आगामी काळात शेतकऱ्यांना लागवड क्षेत्राच्या विस्तारासाठी प्रेरित करण्याचा हा एक आधार ठरणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात, कच्च्या साखरेचा वायदा २७ फेब्रुवारी रोजी निर्धारित जवळपास २२ सेंट प्रती पाउंडच्या सहा वर्षांच्या उच्च स्तरावर आहे. फेब्रुवारीच्या कच्च्या साखरेची किंमत २०.२३ सेंट प्रती पाऊंड होती. तर जानेवारीमध्ये यूएस १८.८७ सेंट प्रती पाऊंड, डिसेंबर २०२२ मध्ये यूएस १८.९३ सेंट होती. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०२२ च्या पहिल्या दहा महिन्यात साखरेची सरासरी किंमत १८.५ सेंट प्रती पाऊंड होती.

रोममधील एजन्सीच्या अनुमानानुसार, २०२९पर्यंत साखरेची किंमत २१.३ सेंटपर्यंत पोहोचेल. मात्र, वास्तव असे आहे की, ही अनुमानीत किंमत जानेवारीमध्ये या आकड्यापेक्षा अधिक झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेचा वायदा गुरुवारी २१.१४ सेंट प्रती पाऊंडवर ट्रेड करीत होता. त्याने एप्रिल २०२० मध्ये ९ सेंट प्रती पाऊंडच्या निच्चांकी स्तरावर पोहोचल्यानंतर आपली तेजी टिकवून ठेवली आहे. जागतिक साखरेच्या किमतींमधील वाढीनंतर व्हिएतनामच्या साखरेच्या किमती २०२२ मध्ये वार्षिक आधारावर ८-१० टक्क्यांनी वाढल्या आहेत. २०२३ च्या आधी साखरेच्या किमतींमध्ये तेजी आल्याने साखर उत्पादकांसाठी चांगले भविष्य निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here