लातूर : विलास सहकारी साखर कारखाना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऊस उत्पादक महिलांचा ‘ऊस पीक लागवड व संगोपन तंत्रज्ञान’ या विषयावर गुरुवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कारखाना कार्यस्थळावर महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) येथील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
महिलांना आधुनिक कस शेती तंत्रज्ञान अवगत करणे, ऊस उत्पादक महिलांना ऊस शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवून देणे व उस उत्पादक महिलांना ऊस शेतीमधून आत्मनिर्भर बनविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळावामध्ये “उसाच्या सुधारित जाती आणि हंगामनिहाय उस जातीचे नियोजन’ या विषयावर वरिष्ठ शास्त्रज्ञ उस प्रजनन विभाग डॉ. जे. एम. रेपाळे, ‘उस पिकासाठी आधुनिक लागवड पध्दती आणि एकात्मिक खत व्यवस्थापन’ या आले आहे.
वरिष्ठ शाखज्ञ व प्रमुख मृदाशास्त्र विभाग डॉ. प्रीती एस. देशमुख, ‘उस शेतीमध्ये जिवाणू खतांचा वापर व महत्त्व’ या विषयावर शाखज्ञ व प्रमुख कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग सुधा घोडके, ‘उसासाठी पाणी नियोजन पारंपरिक आणि सूक्ष्म सिंचन पध्दती या विषयावर संशोधन अधिकारी, कृषी अभियांत्रिकी विभाग शास्त्रज्ञ व शाखज्ञ मोहिनी गायकवाड, ऊस पिकावरील रोग व किडींचे एकात्मिक नियंत्रण वरिष्ठ शास्त्रज्ञ, व प्रमुख पीक संरक्षण विभाग डॉ. बी. एच. पवार मार्गदर्शन करणार आहेत. मेळावास ऊस उत्पादक महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई य सर्व संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.