विश्वास साखर कारखाना समूह शेतीद्वारे ‘एआय’चा प्रयोग राबविणार : माजी आमदार मानसिंगराव नाईक

सांगली : ऊस शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा लाभदायी आणि अधिक उत्पन्न मिळवण्याचा चांगला मार्ग आहे. विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्यावतीने समूह शेती करून हा प्रयोग राबविण्याचा विचार संचालक मंडळ करीत आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. चिखली येथे साखर कारखान्यात ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे (बारामती) कृषी विज्ञान केंद्र ‘नेटाफिम’च्या सहकार्याने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व भविष्यातील ऊस शेती’ विषयावरील स्मार्ट शेतकरी संमेलनात बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ४० टक्के उत्पन्नवाढ, तर ३० टक्के उत्पादन खर्चात बचत झाल्याचे सिद्ध झाले. जमिनीमधील अचूक व आधुनिक माहिती मिळते. ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचा वापर शेतकऱ्यांना अधिक लाभ देणारा ठरणारा आहे. यावेळी कृषीतज्ज्ञ अरुण देशमुख, कृषीतज्ज्ञ डॉ. संतोष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. विराज नाईक यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी लाभदायी आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांनी मागे राहता कामा नये यासाठी विश्वास कारखान्याने प्रयत्न सुरू केलेत असे सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील, आजी-माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here