सोलापूर : माढा तालुक्यात उसाचे राजकारण मोठे आहे. उसाच्या राजकारणाची दहशत होती, ती मोडीत काढली. विठ्ठल कारखान्याने मागील हंगामात जास्तीचा दर दिल्याने जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा लागली असे मत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला. पाटील यांनी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला. मी यापूर्वी जाहीर केलेला दर दिलेला आहे, त्यामुळे साडेतीन हजारांचा शब्द पूर्ण करेन, हा शेतकऱ्यांना विश्वास आहे असे पाटील यांनी सांगितले.
अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की, माझ्या कामामुळे माझ्या उमेदवारीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला आहे. सध्या माढा विधानसभा मतदारसंघातील ७८ गावच्या भेटी गाठी पूर्ण झाल्यात, लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. तालुक्यातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. शहरात १० दिवसाड एकदा पाणी येते उजनी धरण तालुक्यात असताना ११० पैकी केवळ १७ गावात पाणी पोहचवले आहे. गेल्या ३० वर्षांत आमदारांनी माढ्यासाठी काय केले असा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. माढा येथे साडेआठशे एकर जमीन असून त्यामध्ये एमआयडीसी करणार, उपळाई येथे शैक्षणिक हब करू शकतो यासाठी प्रयत्न केले जातील. तालुक्यात वीज पुरवठ्याच्या विषय गंभीर आहे. नोकरी नाही म्हणून बेरोजगार युवकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात आहे. बसस्थानकाची अवस्था वाईट आहे, असे अभिजित पाटील म्हणाले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.