सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब कारखान्याचे १० जानेवारी अखेर ऊस बिल व ३१ डिसेंबर अखेर ६३ कोटी रुपयांचे ऊस तोडणी वाहतूक बिल शेतकरी व वाहनमालक यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
आ. शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या युनिट नं.१ येथे प्रतिदिन १३००० ते १३५०० मे.टन व युनिट नं.२ येथे प्रतिदिन ४५०० ते ५००० मे.टन गाळप होत आहे. युनिट नं.१ येथे आजअखेर ९ लाख३१ हजार ५८४ मे.टन ऊस गाळप झाले आहे. सहविज प्रकल्पातून आजअखेर ३ कोटी ८३ लाख ६२ हजार ५०० युनिट वीज विक्री केली असून डिस्टीलरी प्रकल्पातून १ कोटी ८४ लाख ७० हजार लिटर अल्कोहोल व १ कोटी ४५ लाख ५८ हजार लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. युनिट नं. २ येथे आजअखेर ३ लाख १९ हजार ०९३ मे.टन ऊसाचे गाळप होवून सहविज प्रकल्पातून १ कोटी १७ लाख ३७ हजार युनिट वीज विक्री केली आहे.
आ. बबनराव शिंदे म्हणाले कि, चालू गळीत हंगामामध्ये दि.१६ ते ३१ जानेवारी २०२४ मध्ये गाळपास येणाऱ्या सर्व ऊसासाठी जाहीर केल्याप्रमाणे उत्तेजनार्थ अंतिम ऊस दरापेक्षा प्रतिटन ५० रुपये, १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रति टन १०० रुपये व १ मार्च पासून पुढे गाळपास येणाऱ्या ऊसासाठी प्रतिटन १५० रुपये प्रमाणे वाढीव ऊस दर देण्यात येणार आहे. १२ लाख ५० हजार ६७७ मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामामध्ये युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब कडे दि.१ ते १० जानेवारी या कालावधीत गाळपास आलेल्या १० दिवसाचे ऊसास प्रति टन २७०० रुपये प्रमाणे ४५ कोटींचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.