सोलापूर : पिंपळनेर कार्यक्षेत्रात ३५,३५५ हेक्टर ऊस क्षेत्राची ऊस नोंद झालेली आहे. करकंब कार्यक्षेत्रात ७,७३८ हेक्टर ऊस क्षेत्राची ऊस नोंद झालेली आहे. त्यामुळे या हंगामामध्ये २५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार बबनराव शिंदे यांनी केले. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. युनिट क्रमांक एक पिंपळनेर येथील बॉयलर अग्निप्रदिपन विठ्ठल कॉर्पोरेशनचे संस्थापक चेअरमन आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या बॉयलर पूजन प्रसंगी आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे, रणजितसिंह शिंदे व संचालक मंडळाच्या उपस्थित झाले. युनिट क्रमांक २ करकंब येथील बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते व व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संचालक सुरेश बागल व त्यांच्या पत्नी सुनिता बागल व संचालक पांडरंग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला संचालक पोपट गायकवाड, प्रभाकर कुटे, रमेश येवले-पाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, वेताळ जाधव, विष्णू हुंबे, लाला मोरे, सचिन देशमुख, पोपट चव्हाण आदी उपस्थित होते.