व्होडाफोन-आयडियाला (Vodafone- Idea) तब्बल 51 हजार कोटींचा तोटा झाला असल्याचे स्वत: कंपनीने जाहीर केले आहे. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीअखेर भारतीय कंपनीने जाहीर केलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक तोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने एजीआर प्रकरणी दिलेल्या निकालाचा फटका या दोन्ही कंपनीला बसला आहे. सरकारकडून एजीआर प्रकरणी किती सवलत मिळते? तसेच फेरविचार याचिकेचा काय निकाल होतो. यावर कंपनीचे वर्चस्व टिकून आहे, अशी माहिती व्होडाफोन आणि आयडिया कंपनीने शेअर बाजारात कळवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात मोबाइल पुरवठादार कंपन्यांना दूरसंचार विभागाने देण्यास सांगितलेली रक्कम अदा करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर, सरकारने काही सवलती दिल्यास भारतात व्यवसाय करणे शक्य आहे, असे व्होडाफोन आयडियाचे म्हणणे आहे. व्होडाफोन आणि आयडिया कंपनीला गेल्या वर्षात 4 हजार 874 कोटीचे रुपयांचे नुकसान झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आणि आयडिया तब्बल 44 हजार 150 कोटी रुपयांचा तोटा होईल, असे कंपनीने गृहीत धरले होते.
दरम्यान, या तिमाहित महसूल 42 टक्क्यांनी वाढून 11 हजार 146 कोटी रुपयांवर पोहचला होता. यात काही सुधार होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, तोटा कमी न होता याउलट त्याने 51 हजार कोटींचा आकडा गाठला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.