सातारा – सह्याद्री कारखान्याची मतदार यादी सहसंचालकांच्या आदेशानुसारच : चेअरमन बाळासाहेब पाटील

सातारा : सह्याद्री साखर कारखान्याची मतदार यादी तयार करताना आम्हाला कोणत्याही सभासदास मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवायचे नव्हते. प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी अपूर्ण शेअर असलेले सभासद व मयत सभासदांची स्वतंत्र यादी सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुमुळे कारखाना प्रशासनाने प्रारूप मतदार यादी सादर करताना कार्यवाही केली, असे माजी मंत्री तथा सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. विरोधकांकडून प्रारूप मतदार यादी व अपूर्ण शेअर रक्कम असलेले सभासद या विषयावरून कारखाना प्रशासनासह संचालक मंडळावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

चेअरमन पाटील म्हणाले की, निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतंत्र यादी मागितली नसती तर आम्ही सर्वांचा समावेश असलेली एकच प्रारूप मतदार यादी सादर केली असती. जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय
अधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी २०२३ अर्हता दिनांकानुसार प्रारूप मतदार यादी सादर करण्याची सूचना सप्टेंबर २०२४ मध्ये केली होती. यादी सादर करताना ३०,१३० पात्र सभासद मतदार, शेअर्सचे काम अपूर्ण असलेले २,२२१ सभासद मतदार व मृत ३९२० मतदारांची स्वतंत्रपणे यादी सादर करण्याची स्पष्टपणे सूचना केली होती. या सूचनेनुसार कारखाना प्रशासनाने मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केली होती. अपूर्ण शेअर्स असणाऱ्या सभासदांना पूर्ण रक्कम भरण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार २२२१ पैकी ५६७ जणांनी शेअर रकम पूर्ण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here