‘वाघलवाडा’तर्फे पाच लाख मेट्रिक टन गाळप, कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणार : संदीप पाटील-कवळे

नांदेड : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांमुळे आजपर्यंत व्हीपीके गूळ पावडर कारखाना (प्रयागनगर, सिंधी), एम.व्ही. के. साखर कारखाना (कुसुमनगर, वाघलवाडा) आणि डॉ. शंकरराव चव्हाण गूळ पावडर कारखाना (वाघलवाडा) या तीन प्रकल्पांतर्गत पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाल्याची माहिती उद्योग समूहाचे सीईओ संदीप पाटील-कवळे यांनी दिली.

पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाल्याबद्दल संचालक, सभासद, शेतकरी, वाहतूकदार, ठेकेदारांचे पाटील – कवळे यांनी आभार मानले. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा या तिन्ही कारखाना अंतर्गत ऊस शिल्लक ठेवला जाणार नाही. शेतकऱ्यांनी घाईगडबड करू नये, असे आवाहन संदीप पाटील-कवळे यांनी केले. उद्योग समूहामार्फत कुसुमनगर वाघलवाडा येथे नवीन पाच हजार प्रति मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेचा कारखाना उभारणीचे काम चालू असून नुकतेच या कारखान्याचे भूमिपूजन समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांच्या हस्ते झाले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here