साखर निर्यातीसाठी कारखान्यांना योग्य वेळेची प्रतीक्षा

नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील साखरेच्या किमतीवरील दबावामुळे भारतीय साखरेच्या निर्यातीत अडथळे निर्माण केले आहेत. गेल्या काही महिन्यांत साखरेच्या दरांनी उसळी घेतली होती. या काळात भारताकडून उच्चांकी साखर निर्यातीचे करार करण्यात आले होते.

मात्र, जागतिक स्तरावर परिस्थिती खूप बदलली आहे. त्यामुळे भारतीय साखर कारखाने निर्यातीसाठी जागतिक साखर दरात वाढीची प्रतीक्षा करीत आहेत. इंडियन शुगर मिल असोसिएशनने (इस्मा) सांगितले की, चालू हंगामात अद्याप नऊ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे साखर कारखाने निर्यात करारासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करीत आहेत.

चालू हंगाम २०२१-२२ मधील ऑक्टोबर – नोव्हेंबर या कालावधीत, साखर कारखान्यांनी ६.५ लाख टन साखर निर्यात केली आहे. गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ही ३ लाख टनाने अधिक आहे. इस्माने सांगितले की, कारखान्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ४७.५० लाख टन साखर विक्री केली. तर या कालावधीत सरकारने ४६.५० लाख टन विक्री कोटा मंजूर केला. या दोन महिन्यांच्या दरम्यान, एकूण साखर उत्पादन ११५.५५ लाख टनापर्यंत पोहोचले आहे. तर एक वर्षापूर्वी समान कालावधीत ते ११०.७४ लाख टन होते. ऊस उत्पादक राज्यांत गतीने गाळप सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here