नवी दिल्ली : साखर उद्योगामध्ये २०१९-२० आणि २०२०-२१ या गळीत हंगामातील अतिरिक्त साखर उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत साखरेच्या दरात घसरण झाली आहे. उद्योगाला ऊस दर देण्यासह एक्स मिल दरातील घसरणीला सामना करावा लागत आहे. याबाबत आलेल्या नव्या अहवालानुसार २०२०-२१ या हंगामात उसाची थकबाकी १४००० कोटी रुपये आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० या गळीत हंगामातील थकबाकी ६०० ते ६५० कोटी रुपयांची आहे. त्यामुळे साखर उद्योगाने एमएसपी वाढीची मागणी केली आहे. त्यातून व्याज आणि देखभालीसह उत्पादन खर्चाची पूर्तता होऊ शकते.
श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक जितेंद्र धारू यांनी चीनीमंडी सोबत बातचीत करताना आपले विचार मांडले. श्री दत्त इंडियातर्फे महाराष्ट्रात दोन मुख्य साखर कारखाने चालवले जात आहेत. साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढीबाबत त्यांनी आपले मत प्रदर्शन केले.
चीनीमंडी न्यूजसोबत चर्चा करताना श्री जितेंद्र धारू म्हणाले, साखरेच्या एमएसपीमध्ये वाढीबाबत गेल्या एक वर्षापासून अनेक स्तरावरील बैठकांमध्ये चर्चा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली. मात्र, त्यानंतर लगेच एफआरपीमध्येही वाढ झाली. या निर्णयामुळे फक्त साखर कारखान्यांच्या आर्थिक तरलतेचा मुद्दा संपुष्टात येईल असे नाही तर कारखान्यांना देशभरात मागणी-पुरवठ्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत मिळेल. ऊस दरात गतीने झालेली वाढ आधीच राज्यातील साखर कारखानदारांना चिंतेत टाकत आहे.
व्यापाऱ्यांनाही कमी किंमतीची चिंता आहे, अशी मांडणी करत प्रख्यात शुगर ट्रेडिंग फर्म सत देव ओमप्रकाशचे प्रोप्रायटर अनिल कपूर म्हणाले, सध्याच्या साखरेचे दर एक वर्षाच्या तुलनेत सुमारे ८० रुपये ते १०० रुपये क्विंटलने कमी आहेत. हे दर चांगले संकेत देत नाहीत. जर दरवाढ झाली तर, साखर कारखानदारांसोबत व्यापाऱ्यांनाही चांगल्या व्यवसायासाठी त्याची मदत होऊ शकेल.
कपूर म्हणाले, कोविड १९मुळे साखर उद्योगावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. दीर्घकाळ असलेल्या लॉकडाऊनमुळे साखरेच्या खपात घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे मागणीवर परिणाम झाला. त्याशिवाय मुख्य बाजारपेठांमधील वाहतुकीमध्ये अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे साखरेची दरवाढ झाल्यास बाजारातील स्थितीत व्यापक सुधारणा होऊ शकेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link