हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
मालकी हक्क हस्तांतरणातील गोंधळाने कारवाई
बस्ती (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
वाल्टरगंज साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कारखान्याची विक्री करून तो चालविण्यास देण्याबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. कारखाना खरेदी आणि विक्रीच्या प्रक्रियेसाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करण्यात आली. मात्र, अद्याप अॅग्रीमेंट झालेले नाही. जोपर्यंत खरेदीदार आणि विक्रेता या दोन्ही घटकांकडून जोपर्यंत लेखी करारावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत कायदेशीरदृष्ट्या खरेदीदाराला कारखान्याचा हक्क मिळू शकत नाही. कारखाना
चालविण्याचा परवानाही मिळणार नाही. दरम्या, जिल्हाधिकारी डॉ. राजशेखर यांनी १६ एप्रिलपासून वाल्टरगंज कारखान्याचे अध्यक्ष, संचालकांसह अन्य अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्याचे आदेश निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून फसवणूक होत असल्याचे कामगारांना वाटत असेल तर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अथवा संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी नोंदवाव्यात असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तक्रारी आल्यास प्रशासनाविरोधात खटलेही दाखल केले जातील. कारखाना २५ मार्चपर्यंत सुरू केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ही मुदत उलटून गेल्याने कारखान्याच्या परिसरात आंदोलन सुरू झाले. आठवडाभर सुरू राहिलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅम्प कार्यालयात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत कारखान्याचे उप सरव्यवस्थापक एस. एन. शुल्क आणि खरेदीदार मालकांचे प्रतिनिधी राकेश वर्मा यांनी कारखाना कायदेशीरदृष्ट्या अद्याप मूळ मालकांच्या नावावर असल्याचे सांगितले. कारखाना चालविण्याच्या परवान्याचे अद्याप हस्तांतरण झालेले नाही असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
थकीत देण्यांचे हस्तांतरण
वाल्टरगंज कारखान्याकडून २०१६-१७ आणि २०१७-१८ या गळीत हंगामातील एकूण ५४ कोटी रुपये ऊस बिले आणि कारखान्यातील कामगारांचे सुमारे ७ कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. कारखाना २०१६ पासूनच बंद होण्याच्या स्थितीत आला होता. त्यामुळे त्यावेळी नजिकच्या रुधौली साखर कारखान्याकडे ऊस पाठविण्यात आला होता. तर आता यंदाच्या गळीत हंगामात २०१८-१९ मध्ये वाल्टरगंज साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसही रुधौली कारखान्याला पाठविण्यात आला आहे. एकूण तीन हंगामातील उसाची बिले रुधौली साखर
कारखान्याकडे थकित आहेत. या तीन हंगामातील वाल्टरगंज कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांचे पैसे रुधौली कारखाना देऊ शकेल का ? याविषयी शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. बिले थकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतच्या देण्यांचे पूर्ण विवतरण तयार करून ऊस विभागाच्या आयुक्तांकडे मागणीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न केले जातील.
साखर क्षेत्रात पहिले पाऊल
वाल्टरगंज साखर कारखाना खरेदी करणारी पंजाब येथील राजपुरा येथील लिव्हिंग रेडियस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सोलर पॉवर प्रोजेक्टशी संबंधित कंपनी आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी राकेश वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे साखर क्षेत्रातील हे पहिले पाऊल आहे. कंपनीने हा पहिला साखर कारखाना खरेदी केला आहे. मात्र, आतापर्यंत लेखी करारावर न झाल्याने प्रकरण थंडावले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp