उत्तर प्रदेशमध्ये कारखान्याचे गोदाम भरले, उघड्यावर राहिली साखर

साठीयांव(उत्तर प्रदेश ): किसान सहकारी साखर कारखाना, साठीयांव मध्ये चार लाख क्विंटल साखर गोदाम रिकामे नसल्यामुळे उघडयावर ठेवण्यात आली आहे. गोदामात पूर्वीच्या हंगामातील उत्पादित साखरेची विक्री न होण्यामुळे गोदाम पूर्ण भरलेले आहे. गेल्या हंगामातील एक लाख 74 हजार क्विंटल साख़र त्यात आहे.

कारखान्याची स्टोअर रुम निर्माणाधीन आहे. तिथेच जे गोदाम आहे त्यात साखर ठेवण्यासाठी जागा नाही. यासाठी साखरेला अन्य ठिकाणी ठेवले जात आहे. मालाचा वापर न झाल्यामुळे साखर ठेवण्यात बाधा येत आहे. एक स्टोअर रुम बांधण्याचे काम सुरु आहे, पण त्याला पूर्ण व्हायला वेळ लागेल. साखर उघडयावर ठेवण्यात आली आहे. साखर कारखाना साठीयांव मध्ये साखरेचे सतत उत्पादन होते. गेल्या वर्षी जवळपास एक लाख 74 हजार क्विंटल साखरेचा स्टॉल पडलेला आहे. यावर्षी जवळपास दोन लाख क्विंटल पेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले. याप्रकारे एकूण स्टॉक जवळपास चार लाख क्विटल इतका झाला आहे. 50 हजार क्विंटल खुझिया व फखरुद्दीन येथील एका खाजगी गोदामात ठेवले आहे. याशिवाय मउ जनपद च्या कॉटन मिललादेखील साखरेचे गोदाम बनवले आहे. साखरेच्या किमतीचे निर्धारण साखर कारखाना संघाकडून होते आणि त्याचा उठाव भारत सरकारच्या आदेशाने होतो . ही प्रक्रिया जटील असल्याने यामुळे आज साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक आहे. साखर कारखान्याचे जीएम प्रताप नारायण यांनी सांगितले, साखरेच्या उठावानंतरच या समस्येचे काही प्रमाणात निराकरण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here