सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने ३००० रुपयांपेक्षा जास्त दर देत आहेत. मात्र राजेवाडी येथील श्री श्री रविशंकर कारखाना २७०० रुपये दर देत आहे. ज्या सभासदांच्या जिवावर कारखाना उभा राहिला, त्यांचा ऊस तोडत नाही. जादा ऊस दर द्यावा आणि सभासदांचा ऊस प्राधान्याने तोडावा या मागणीसाठी सोमवारी, दि. ५ फेब्रुवारी रोजी राजेवाडी कारखान्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आयोजित बैठकीत जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले की, डाळिंब, दूध आणि ऊस प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी आटपाडी तालुक्यात ८ फेब्रुवारीपासून जनआक्रोश संवाद यात्रा काढण्यात सांगितले. त्यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. यावेळी जीवन मोरे, जगन्नाथ मोरे, विजय माने यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला विजय शिरकांडे, हिरुलाल मुलाणी आदी उपस्थित होते.