शामली, उत्तर प्रदेश: सोमवारी जिल्ह्यातील शेतकर्यांनी सहकारी ऊस समितीत पोचून मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक निवेदन जिल्हा ऊस अधिकार्यांना दिले. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये 500 करोड रुपयांच्या आसपास साखर कारखान्यांवर शेतकर्यांची थकबाकी आहे. ऊस थकबाकी न मिळाल्यामुळे शेतकर्यांना घरखर्च चावलणे अवघड होत आहे. सणासुदीचे दिवस पाहता शेतकर्यांची ऊस थकबाकी ताबडतोब भागवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन शेतकर्यांना सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येवू नये. त्यांनी सांगितले की, शेतकर्यांच्या आगामी पीकाचे खत, औषध, बिया घेऊ शकतील यासाठी त्यांची थकबाकी भागवणे आवश्यक आहे. त्यांनी शेतकर्यांचे देय न मिळाल्याने आगामी 30 ऑक्टोबर ला उन तालुक्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी राजन चावला, सतपाल पहलवान, आशिक मंसूरी, नदीम खान, बबलू, लखन बालियान, अंकुर पंडित, सागर पंडित, विजयपाल, कार्तिक शर्मा, अनीश मलिक, नावेद बलवा आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.