लखनऊ: राज्याच्या कृषि विभागाने राज्याच्या पश्चिम भागामध्ये टोळधाडीच्या आक्रमाणाचा इशारा दिला आहे. कृषी विभागाने सावधानतेचा इशारा देताना सांगितले की, शेजारचे राज्य राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये टोळधाडीच्या धोक्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांच्या आक्रमणावर ताबा मिळवला जावू शकेल. कृषी विभागाने या धोक्याशी सामना करण्यासाटी अनेक परिणामकारक उपायांची सविस्तर माहिती दिली आहे. आणि सांगितले आहे की, जर गरज लागली तर फायर ब्रिगेडचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल.
कृषी विभागाने सूचवले आहे की, पश्चिमी उत्तर प्रदेशातील सहारनपूर, मुजफ्फरनगर, शामली, मेरठ, बागपत, हापुड, मथुरा, आगरा, गाजियाबाद आणि अलीगड या जिल्ह्यांमध्ये टोळधाडीबाबत अधिक सावधान राहिले पाहिजे.
टोळधाडीचे हे दल हजारो लाखोंच्या संख्येत असतात. जे एका रात्रीमध्ये सार्या पीकाचे नुकसान करतात . जर टोळधाडीचे आक्रमण झाले तर शेतकर्यांचे फार मोठे नुकसान होवू शकते
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.