श्रीलंकेमध्ये साखर आयातीवर टैक्स लावण्याचा इशारा

कोलंबो: व्यापार मंत्री बंडुला गुनवर्दाना यांनी इशारा दिला की, जर साखरेच्या कमी किमतींचा लाभ जनतेला दिला गेला नाही तर साखरेवर आयात टैक्स लावला जाईल. महागाईशी निपटण्यासाठी 13 ऑक्टोबर ला श्रीलंका सरकारने डाळ, कांदा आणि साखरेसहीत अनेक आवश्यक वस्तूंवर आयात शुल्क हटवले आहे. टैक्स हटवल्यानंतर आता एक किलो साखर 85 रुपये किलो विकली जावी. श्रीलंका कैंटीन ओनर्स असोंसिएशन चे अध्यक्ष असला संपत यांनी सांगितले की, साखरेच्या कमी किमतीचा लाभ लोकांना दिला जात नाही.

उपभोक्ता अधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रंजीत विथानगे यांनी सांगितले की, नोटीफिकेशन च्या माध्यमातून साखरेवर एक फिक्स दर लावला गेला पाहिजे. व्यापार मंत्री बंडुला गुनवर्दाना यांनी सांगितले की, जर लोकांना लाभ दिला गेला नाही तर, आयात टैक्स संपवण्याचा कोणताही अर्थ नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here