थकीत ऊस बिले न दिल्यास डिसेंबरमध्ये कारखाने बंद पाडण्याचा इशारा

लखीमपूर खीरी : दिवाळीपूर्वी साखर कारखान्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ऊसाची थकीत बिले न दिल्याबद्दल आमदार अरविंद गिरी अद्याप नाराज आहेत. आमदार गिरी यांचे काका, धर्मेंद्र गिरी मोन्टी आणि भाजपचे नेते विश्वनाथ सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यानी नोव्हेंबर महिन्यात सर्व थकीत पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. जर या मुदतीत पैसे मिळाले नाहीत, तर डिसेंबर महिन्यात कारखाना बंद पाडला जाईल.

ते म्हणाले, साखर कारखान्याचे युनिट हेड ओमपाल सिंह यांनी सात नोव्हेंबर रोजी लेखी आश्वासन दिले होते. १५ ते २० डिसेंबरपर्यंतची थकीत ऊस बिले १० नोव्हेंबरपर्यंत कारखाना सुरू होण्यापू्र्वी दिली जातील. उर्वरीत ऊस थकबाकी नोव्हेंबर महिन्यात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अधिकारी प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना आश्वासनांवर आश्वासने देत आहेत. आणि फसवणूक करून शोषण केले जात आहे. मात्र, आता हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here