ऋषिकेष : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी डोईवाला साखर कारखाना प्रशासनाला इशारा दिला आहे. थकीत ऊस बिले मिळाली नसल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यांनी ऊस पुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे.
डोईवाला येथील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी तहसील कार्यालयात धाव घेतली. त्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. डोईवाला कारखान्याचे प्रशासन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. त्यांनी कारखान्यामध्ये आंदोलन करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली. मात्र, उप जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहिता आणि कोरोना कालावधीचे कारण देत परवानगी देण्यास नकार दिला. शेतकऱ्यांनी सांगितले की गेल्या दोन महिन्यापासून कारखान्यात ऊसाचे गाळप सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या पैसे देण्यात आलेले नाही.
जर तीन दिवसांत पैसे मिळाले नाहीत, तर शेतकरी ऊस पुरवठा बंद करतील. यावेळी सहकारी ऊस विकास समितीचे अध्यक्ष मनोज नौटियाल, भारतीय किसान युनियनचे (टिकेत) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंह खालसा, उमेद बोहरा, दलजीत सिंह, ताजेंद्र सिंह, बलबीर सिंह, मोहित उनियाल, तेजपाल सिंह, माँटी आदी उपस्थित होते.