बेंगळुरुमध्ये सर्वत्र पाणीच पाणी, पावसाने जनजीवन विस्कळीत

बेंगळुरू: रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बेंगळुरुमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणी साठले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रिंग रोड, मुख्य मार्ग, पॉश भाग पाण्याने भरले आहेत. ढगफुटी झाल्याने धुवाधार पाऊस झाल्याचे सांगितले आहे. मुख्य मार्गावर पाण्याने भिषण ट्रॅफिक जॅमची स्थिती निर्माण झाली आहे. लोक हवालदिल झाले असून कॅबसह सर्व सेवांना याचा फटका बसला आहे.

टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, वीकेंड असल्याने घराबाहेर पडलेले हजारो लोक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. रस्त्यांवर पाणी असल्याने स्थिती गंभीर बनली आहे. शहरात तीन मुख्य मार्गंवर झाडे कोसळली आहेत. आरजीएम इकोस्कोप टेक्नोलोजी पार्कच्या परिसरात पाणी साठल्याने लोकांना मेट्रो स्टेशनचा आसरा घ्यावा लागला आहे. अशा प्रकारचा भिषण पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नसल्याचे महालक्ष्मी आऊटलेटमधील नटराज यांनी सांगितले. रविवारी रात्री आठ वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर जोरदार पाऊस कोसळला. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी मदतकार्य सुरू केले असून लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात येत आहे. बेलान्दूर, सरजापुरा रोड, व्हाइटफील्ड, बाह्य वळण रस्ता आणि बीईएमएल लेआउट या भागाला मोठा फटका बसला आहे. बंगळुरू महानगरपालिकेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here