पुणे शहर आणि जिल्ह्यातील चार तालुक्यांना सिंचन आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणार्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे; खडकवासला साखळीतील चारही धरणांत अवघ्या चार दिवसांत सुमारे पावणेसहा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण साठा एकवीस टीएमसीवर पोहोचल्याने शहरासह जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या पेयजलासह घरगुती वापर आणि सिंचन यासाठी पंधरा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पात रविवारपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवारी दिवसभर खडकवासला साखळीतील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश धरणांत संततधार सुरूच होती. खडकवासला साखळीतील टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत 69 आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोमवारी सायंकाळपर्यंत खडकवासला साखळीमध्ये असलेल्या चारही धरणांत 20.97 टीएमसी (71.93 टक्के) पाणीसाठा झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्यात 5 हजार 136 क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत 29 आणि सायंकाळी पाचपर्यंत 27 मिलिमीटर पाऊस झाला. निरा-देवघरला सकाळ पर्यंत 67 आणि सायंकाळ पर्यंत 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भाटघरला सकाळ पर्यंत 17 आणि सायंकाळ पर्यंत 25 मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणीत 2.92 (74.14 टक्के), निरा-देवघर 8.27 (70.54 टक्के), भाटघर 15.72 (66.90 टक्के) आणि वीर धरणात 9.20 (97.83 टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वीर धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने सोमवारी सकाळी डाव्या आणि उजव्या कालव्यातून 2,150 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी त्यात 13 हजार 716 क्यूसेक वाढ करण्यात आली असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या हस्ते दीपावली पाडव्यानिमित्त गूळ सौदे काढण्यात आले....
सोलापूर : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि; सदाशिवनगर २०२३-२४ चा ५१ वा गळीत हंगामाला सुरुवात झाली. कारखान्याच्या गव्हाणीचे व मोळीचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ...
यमुनानगर : उसाच्या सीओ-१५०२३ या नवीन जातीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. सीओ-२३८ या ऊस जातीला लाल सडसारख्या रोगांपासून दिलासा देण्यासाठी हा...
बिजनौर : जिल्ह्यात लाल सड रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकरी...
सोलापूर : 'दामाजी कारखान्याने कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कामगारांना १७ दिवसांच्या पगाराएवढा बोनस अदा केला आहे. कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपला ऊस दामाजी कारखान्याच्या...
पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन (विस्मा) चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले कि, महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षी पर्जन्यमान अतिशय...