ढाका : बांगलादेशने भारताला रमजानपूर्वी ५०,००० टन कांदा आणि १,००,००० टन साखर निर्यात करण्याची विनंती केली आहे.परराष्ट्र मंत्री डॉ. हसन महमूद यांनी म्हणाले की, त्यांनी नुकत्याच झालेल्या भारत भेटीदरम्यान ही विनंती केली आहे. तर भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी २०,००० टन कांदा आणि १०,००० टन साखर निर्यात करण्याचे आश्वासन दिले होते.
परराष्ट्र मंत्री डॉ. हसन महमूद यांनी ९ फेब्रुवारी रोजी भारतीय मंत्र्याची भेट घेतली. मंत्री हसन म्हणाले की, आम्ही अनेक जीवनावश्यक वस्तू, विशेषत: कांदा, साखर, डाळी आणि मसाल्यांसाठी भारतीय बाजारपेठेवर अवलंबून आहोत. ते म्हणाले की, मी त्यांना आमच्यासाठी निर्यातीचा कोटा ठरवून देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडून योग्य किमतीत आणि आमच्या गरजेनुसार आयात करू शकू. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बांगलादेशला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. आम्ही लवकरच औपचारिक आमंत्रणे पाठवू, असेही ते म्हणाले.