पुणे : यशवंत साखर कारखाना सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. लोणीकाळभोर येथे महाविकास आघाडीचे उमेदवारी आमदार अशोक पवार यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते माधव काळभोर, युवा नेते रंगनाथ काळभोर, प्रवक्ते विकास लवांडे, शरद काळभोर, सागर काळभोर, भारती शेवाळे, शिवसेनेचे स्वप्निल कुंजीर, नाना आबनावे, सनी काळभोर, नागेश काळभोर, संदीप गोते, माधुरी काळभोर, राजेंद्र खांदवे, संतोष कुंजीर, स्मिता नॉर्टन, गोरख सातव, जगदीश महाडिक व ऋषीराज पवार हे उपस्थित होते.
त्या म्हणाल्या कि, अशोक पवार यांच्या कुटूंबाला त्रास दिला गेला. पण हा माणूस डगमगला नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला ही लढाई दिल्लीपर्यंत न्यावी लागेल. तर आमदार अशोक पवार म्हणाले की, मतदारसंघातील नर्सरी धारकांचा मोठा प्रश्न आहे. ज्या नर्सरीधारकांचे वादळ वाऱ्याने नुकसान झाले, त्या नर्सरी धारकांना नुकसानभरपाईची तरतूद कशी मिळेल याचा विचार करू.