पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष, शदर पवार यांनी संजीवनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी गोवा सरकारला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याची गरज आहे. यासाठी गोवा सरकारला जर गरज असेल तर आम्ही सर्वोतोपरी मदत करू असे पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पणजी येथे पक्षाच्या कार्यकारी परिषदेची बैठक झाली. एनसीपीचे राज्य प्रमुख जोस फिलिप डिसूझा, आमदार चर्चिल अलोमाओ उपस्थित होते. पवार दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, गोव्यातील राजकीय भूमिकेबाबत अद्याप आम्ही कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.