सोलापूर : कुर्डुवाडीसह ३६ गावांतील शेतकऱ्यांनी उसाबाबत चिंता करू नये. येथील ऊस उत्पादकांच्या उसाचे एक कांडी शिल्लक राहणार नाही असे आश्वासन आमदार बबनराव शिंदे यांनी आश्वासन दिले. बारलोणी (ता. माढा) येथे आमदार संजय शिंदे यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात आमदार बबनराव शिंदे बोलत होते. कुर्डुवाडी येथे ट्रामा हॉस्पिटल व टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय सुरू होत आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आमदार संजय शिंदे म्हणाले, मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला. कुर्डुवाडी पाणी पुरवठा निधी मंजुरी होईल. सीना-माढा सिंचनाची उर्वरित सिंचन कामे मंजुरी मिळताच कामे सुरू होतील असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर रमेश शिंदे, यशवंत शिंदे, माजी आमदार विनायकराव पाटील, बंडू ढवळे, वामनराव उबाळे, व्यंकटेश पाटील, बारलोणीचे सुरेश बागल, अण्णासाहेब ढाणे, संदीप पाटील, अस्लम काझी, वलीमहंमद मुलाणी, संजय गोरे, निवृत्ती गोरे, अरुण काकडे आदी उपस्थित होते. आमदार शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेतला.