हवामान अंदाज : पुढील २४ तासात देशात या ठिकाणी बरसणार पाऊस

नवी दिल्ली : देशात पुढील २४ तासांत हवामानात बदल होणार आहे. जम्मू-काश्मिरपासून तामीळनाडूपर्यंत विविध ठिकाणी वातावरणात बदल दिसून येईल. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) देशात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये ७ मार्च आणि ९ मार्च रोजी जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश येथे हलका पाऊस होईल. याशिवाय या ठिकाणी जोरदार पाऊस, गारपीटही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर काश्मीरमध्ये पाऊस अथवा जोरदार बर्षवृष्टी होऊ शकते.

महाराष्ट्र व पश्चिम मध्य प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे. वातावरणात दररोज नवा बदल दिसून येत आहे. त्याअंतर्गत ७ ते १० मार्च २०२२ या कालावधीत महाराष्ट्र, गुजरातचा पूर्व भाग, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग येथे पावसाची शक्यता आहे. आठ मार्च रोजी राजस्थानमध्ये वातावरण बदल होईल. राज्याच्या काही भागांसह हरियाणात काही ठिकाणी, महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू, केरळमध्ये विविध ठिकाणी पावसाळी वातावरण असेल. नऊ मार्चपर्यंत दिल्ली, एनसीआर आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हलका पाऊस अथवा वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here