हवामान अपडेट : बेंगळुरुमध्ये पूरसदृश्य स्थिती, आसाममध्येही पूर, भूस्खलनाचा ४ लाख लोकांना फटका

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सतत सुरू असलेल्या पावसाने राजधानी बेंगळुरूच्या विविध भागात पाणी साठले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी आणि गुरुवारी कर्नाटकच्या किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला. मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसानंतर बंगळुरुमधील कावेरी पाइपलाइनजवळ दोन कामगार मृतावस्थेत आढळल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

मनीकंट्रोल डॉट कॉमवरील वृत्तानुसार, बेंगळुरुमध्ये मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावरील वाहने पाण्यात बुडाल्याचे चित्र होते. अनेक भागात चार फूट पाणी साचले होते. त्यामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागला. मौर्या रोडवर ४ फूट, सुल्तानपेट आणि नागार्थपेटमध्ये ३-३ फूट पाणी साठले होते. सिरसी सर्कल फ्लायओव्हरवही मोठ्या प्रमाणात पाणी होते. दुसरीकडे आसाममध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. आसनी चक्रीवादळाने आसाममध्ये सतत पाऊस सुरू आहे. पावसाने हजारो लोकांना फटका बसला आहे. उदलगुरी जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुरात आतापर्यंत ८ जणांना जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांतील ४ लाख लोकांना पुराचा फटका बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गेल्या २४ तासात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here