केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी हंगाम 2020 -21 मध्ये जवळपास 60 लाख टन साखरेच्या निर्यातीीसाठी 3,500 करोड़ रुपयांंच्या सब्सिडी पैकेज ला मंजूरी दीली. यावर धामपुर शुगर्स चे एमडी गौरव गोयल यांनी सांगितले की, केंद्र सरकार ने उचललेले पाऊल चांगले आहे. ही वेळेची गरज होती. भारत या हगामाामध्येही 31-31.50 मिलियन टन साखरेचे उत्पादन करणार आहे. साखरेच्या अधिशेष उत्पादनामुळे 6 मिलियन टन साखर निर्यातीमुळे साखर कारखान्यांना आपला अधिशेष स्टॉक कमी करण्यात मदत होऊ शकते.
गोयल यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी या वर्षी 6 मिलियन टन साखर निर्यातीसाठी कंबर कसली आहे. सरकार द्वारा देण्यात आलेली 3,500 करोड़ रुपयाची निर्यात सब्सिडी थोड़ी कमी आहे, पण सरकारचे हे पाऊल स्वागताहे आहे. मला विश्वास आहे की, भारतीय कारखाने पुढच्या 10 महीन्यांमध्ये 6 मिलियन टन निर्यात करण्यात कामयाब होतील. धामपुर शुगर्स च्या निर्यातीवर त्यांनी सांगितले, आमच्याकडून उत्पादीत साखरेचा जवळपास पाचवा भाग आम्ही निर्यात करणार आहोत. आमच्याकडे आमच्या निर्यात कोटयाकडे लक्ष ठेवण्यासाठी पुरेसा स्टॉक आहे. त्यांनी दावा केला की, जशी साखरेची निर्यात सुरु होईल, स्थानिक साखर विक्री वर दबाव नक्की कमी होईल.